Lasik

Home/Lasik
Lasik 2017-04-17T10:44:20+00:00

वेव्हलाईट एक्झायमर लेझरप्रणाली

 • चष्म्याचा कोणताही नंबर खात्रीशीरपणे घालवण्यासाठी पुर्वापार उपलब्ध लेझर मशिन्सच्या तुलनेने अत्याधुनिक प्रणाली
 • ‌‌‌‌‌ॲक्टीव आय ट्रॅकर व ०.९५ मि. मि. लेझरकीरण(लेझर उपचारांच्या अचुकपणासाठी)
 • जगप्रसिध्द मोरीआ ई ३(फ्रान्स) मायक्रोकेरॅटोमची व एस. बी. के. तंत्रज्ञानाची विशेष सुविधा
 • अमेरिकन FDA प्रमाणित लॅसिक तंत्रज्ञानाची सोय.
 • भुलीचे इंजेक्शन नाही
 • लेझर उपचारानंतर पट्टीची गरज नाही
 • जर्मनी प्रशिक्षित तज्ञाकडुन उपचार
 • जाड प्लस, मायनस सर्व प्रकारच्या चष्म्याच्या नंबरसाठी उपयुक्त
 • मुंबई पुण्याच्या तुलनेने कमी खर्चात उपचार

द्रृष्टीदोष आणि त्यावरील उपचार

पी. आर. के.

 • हस्वद्रुष्टी(मायोपिया) मायनस नंबरचा चष्मा
 • दिर्घद्रुष्टी(हायपरमेट्रोपिया) प्लस नंबरचा चष्मा
 • ऍस्टिगमॅटीझम – (सिलेंड्रिकल नंबरचा चष्मा)
 • प्रेसबायोपिया – (चाळीशीचा चष्मा)

अशा सर्वप्रकारच्या द्रुष्टीदोषांसठी चष्मा कींवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे हे सर्वसाधारण प्रचलित उपचार आहेत. पण त्यांच्या वापरामुळे द्रुष्टीदोष कायमचा जाऊ शकत नाही.चष्म्यासंबंधी लोकांच्या मनात तीव्र अनिच्छा आढ्ळ्ते काहीही करा पण चष्मा घालवा माझा. असे न म्हणणारे रुग्ण विरळाच. या कल्पनेतुनच सर्व प्रथम रेडीयल केरॅटॉटॅमी या शस्त्रक्रियेचा रशियामध्ये शोध लागला. सुमारे ३० वर्षापुर्वी फ्योदोराव्ह या रशियन याने या तंत्राचा शोध लावला.

हस्वद्रुष्टी असणार्‍या रुग्नांना त्यांच्या पारदर्शक बाह्यपटलावर सुर्यकीरणांच्या स्वरुपाचे छेद देऊन बुबुळाचा आकार या तंत्राव्दारे बदलता जात असे. पण तंत्राच्या अनेक उणीवा लक्षात आल्यामुळे हे तंत्र आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे.

गेल्या १५ – २० वर्षापासुन नंबर कमी करण्यासाठी लेसरचे जे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.त्याचे नाव पी. आर. के. या तंत्राव्दारे बुबुळा्च्या पारदर्शक बाह्यपट्लाच्या (कार्निआ) बाह्यपेशिचे आवरन (एपिथेलियम) काढ्ले जाते आणि

बह्यपट्लावर लेझर किरण सोडुन आपल्याला पाहिजेत्या नंबरप्रमाने त्या मापाचे भिंगच अतिसुक्ष्म स्वरुपात कोरले जाते.त्यानंतर बाह्यपेशिचे आवरन (एपिथेलियम) नैसर्गिकरित्या परत वाढावे यासाठी डोळ्यांना २४ ते ४८ तास पट्टी बांधली जाते.

 

लॅसिक (लेझर इन सिटु केरॅटोमिल्यूसिस)

हि लेझर उपचार पध्दती सध्या सर्व प्रगत देशामंध्ये लोकप्रिय ठरली आहे. १९९४ सालापासुन या लेझर पध्दतीचा वापर सुरु झाला. यामध्ये पी. आर. के. तंत्रामधिल ज्या उणिवा शास्त्रज्ञांच्या लक्षात आला तो घालविण्याचा प्रयत्न केला

गेला आहे.लॅसिक लेझर पध्दत हि अता १९९८ सालापासुन अमेरिकेच्या एफ. डि. ए या जगन्मान्य सस्थेने प्रमाणित केलेली आहे. या पध्दतीचा उपचार अमेरिका, कॅनडा सर्व युरोपिय देश व जपान सारख्या प्रगत देशात सर्रास केले जातात.

लॅसिकच्या उपचारामध्ये अपल्या डोळ्याच्या पारदर्शक बाह्यपटलाच्या बाह्य आवरनाची जाडी १३० ते १६० मायक्रान्स नावाच्या यंत्राच्या सहाय्याने तयार केली जाते (Lasik 1). ती हळु्च बाजुला दुमड्ली जाते आणि नंतर बाह्यपट्लाच्या (कोर्निआच्या) आतील भागावर लेझर किरण सोडले जाऊन त्याठिकानी योग्य त्या मापाचे भिंग कोरले जाते (Lasik 2). (Microscope Reshaping) त्यानंतर बाजुला दुमड्लेली हि चकती परत पुर्ववत केली जाते (Lasik 3).

लॅसिकचे उपचार कोणाला करुण घेता येतील?

१८ वर्षावरील व्यक्ती आणि ज्यांचे नंबर निदान १ वर्ष स्थिर राहिले आहेत(बदललेले नाहित).

साधारणपणे १ किंवा १ नंबरपेक्षा जास्त नंबर असल्यास हे उपचार करणे चागले.

गरोदर स्त्रियांनी मुल साधारण १ वर्षाचे झल्यावर हे उपचार करावेत.

keratomileusis-laser-assisted--c2

लेझर उपचारापुर्वी तपासणी

लेझर उपचार करण्यापुर्वी तुमच्या डोळ्यांची कोम्प्युटरव्दारे वेगवेगळ्या प्रकारची तपासणी केली जाते. त्यामध्ये

 • तुमच्या डोळ्यांचा अचुक नंबर काढणे
 • बाह्यपटलाची जाडी पॅकीमेट्रीच्या यत्राव्दारे मोजणे
 • डोळ्यांच्या बुबुळाचा संपुर्ण नकाशा (टोपोग्राफी) मशीणच्या सहाय्याने तयार करणे
 • बाह्यपटलाची गोलाई वेगवेगळ्या अंशातून केरॅटोमीटरच्या सहाय्याने मोजणे.
 • डोळ्यांच्या अंतःपट्लाची इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी व बायोमायक्रोस्कोपिच्या सहय्याने सखोल तपासणी करणे व ओ. सि. टि.(डोळ्यांच्या बुबुळाचे व अंतर्भागचे स्कॅनींग) यासारख्या अनेक तपासण्यांचा समावेश आहे.

य तपासण्यां केल्यानंतर तुमचे डोळे लॅसीक किंवा पी. आर. के. अथवा आधुनिक अशा वेव्हफ्रंट (कस्टमाईजड) लॅसीक , एस. बी. के. एपिलॅसिक या सारख्या कुठल्या उपचारासाठी योग्य आहेत व तुमच्या संपुर्ण नंबरचा इलाज करता येईल किंवा कसे याची नक्की माहीती कळु शकते व डॉक्टर त्यानुसार तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतात.

या तपासण्यांसाठी वेगळी फी द्यावी लागते.

लेझर उपचाराआधी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

साधारणतः २ वर्षे स्थीर असणारा नंबर पुढे वाढणार नाही हे ग्रृहीत धरुन आपला आज आसणारा नंबर पुर्णपणे घालवण्यासाठी कींवा योग्य तेवढा कमी करण्यासाठी लेझर मशीनच्या कॉम्प्युटरला आज्ञावली (programmng)

दीली जाते. डोळ्यांचा पारदर्शक भाग ह लवचिक आसल्यामुळे व काही रुग्नामध्ये बीज दोशामुळे नंबर वाढण्याची क्रीया नंतरही डोळ्यांच्या पेशीमध्ये राहु शकते. आज घालवलेला नंबर कायमस्वरुपी जात असलातरी भविष्यात डोळ्यात होणारे बदल थोपविता येत नाहीत. तसेच बाळंतपणामध्ये झालेले हार्मोन्स मधील बदल , थायरॉईड्चा दोष , मधुमेह अशा कारणामुळे काही प्रमानात आलेला नंबर पुन्हा ट्रिट्मॅंट देऊन घालावीणे शक्य आसते. बाह्यपट्लाची लेझर उपचारानंतर मिळ्णारी प्रतीक्रिया ही प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी असते,त्यामुळे दोन रुग्णामध्ये किंवा एकाच रुग्णाच्या दोन्ही दोळ्याच्या अंतिम नंबरमध्ये थोडाफार फरक राहू शकतो.