FAQ

Home/FAQ
FAQ 2017-04-17T10:44:20+00:00
वयाच्या अठरा वर्षा नंतर हे उपचार करुन घ्यावेत.चष्म्याचा नंबर १ वर्ष स्थिर झालेला असावा . बाकी वयाची अट नाही.
योग्य पध्दतीने व आधुनीक मशिनच्या सहाय्याने केलेले उपचार अतिशय निर्धोक आहेत. लेझरमुळे मोतीबींदुसारखे काचबींदुसारखे विकार संभवत नहित. पी. आर. के. चा उपचार -५ पेक्षा जास्त नंबर असणार्या लोकांसाठी केला तर बुबुळावर थोडासा धुरकटपणा येऊ शकतो.पण तो औषधोपचार केल्यानंतर नाहीसा होतो. लॅसिकच्या उपचारामध्ये असा धुरकटपणा येत नाही. नेहमीच्या मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेमध्ये आढळणार्या धोक्यापेक्षा हे उपचार शतपटिने अधिक सुरक्षित आहेत.
भुलीचे इंजेक्शन घ्यावे लागत नाही. फक्त डोळ्यात थेंब घालुन हे उपचार होतात. तसेच टाके घालावे लागत नाहीत.
काही सेकंदात एका डोळ्याचा लेझरचा उपचार होतो. लेझर किरण सोडण्यापुर्वी ५ ते १० मिनिटे कालावधी इतर तयारीसाठी लागतो.